पार्टीमध्ये शाहरुख खानच्या हातात साप, व्हिडीओ व्हायरल!
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लाडकी मुलगी ईशा अंबानी आणि जावई आनंद परिमल यांच्यासाठी शनिवारचा दिवस खूप खास होता. 18 नोव्हेंबरला त्यांच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस होता. अंबानी कुटुंबाकडून एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. अभिनेता शाहरुख खान देखील या पार्टीत होते. आता पार्टीतील शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या हातात भला मोठा साप दिसत आहे.
त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख अनंत अंबानी सोबत बोलताना दिसत आहे.
बोलत असताना अनंत अंबानी अचानक शाहरुख खानच्या हातात साप ठेवतात. यानंतर मागून कोणीतरी शाहरुखच्या गळ्यात जिवंत साप लटकवतो. 'पठाण' घाबरत नाहीत. ते साप धारण करतात.असं म्हटल्यावर शाहरुख स्मितहास्य देतात.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खानने यावर्षी 'पठाण' आणि 'जवान' सारखे हिट सिनेमे दिले आहेत. आता राजकुमार हिरानी दिग्दर्शित त्याच्या 'डँकी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात तापसी पन्नू आणि विकी कौशल सारखे स्टार्स देखील आहेत.
Edited by - Priya Dixit