सोहळा सख्यांचा’ – मजेशीर खेळ, गप्पा, आणि आठवणींचा खजिना सन मराठीवर!
सोहळा सख्यांचा – मजेशीर खेळ, गप्पा, आणि आठवणींचा खजिना, आता महिलांसाठी एक अविस्मरणीय अनुभव फक्त सन मराठीवर!
सन मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक अनोखा कार्यक्रम – सोहळा सख्यांचा! हा कार्यक्रम खास महिलांसाठी आहे, जिथे त्यांना आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, मैत्रिणींसोबत धमाल मज्जा करता येईल आणि सर्व मैत्रिणी सन मराठी वाहिनीवर झळकतील. अशिष पवार या शोचे सुत्रसंचालन जरी करत असला तरीही या शो मधल्या खऱ्या सेलिब्रिटी स्त्रियाच असणार आहेत. आशिष त्यांना माहेरच्या आठवणीत रमवणार, त्यांच्या बरोबर बालपणीचे खेळ खेळणार तर कधी त्यांच्या मनातलं दुःख ऐकून घेणार. प्रत्येक स्त्रीला आपली गोष्ट जगा समोर मांडण्याची संधी मिळणार.
सोहळा सख्यांचा कार्यक्रम सोमवार ते शनिवार, संध्या. ६:३० वा. सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात राबविण्याचा सन मराठी वाहिनीचा मानस आहे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातल्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास आणि अडचणींना जगासमोर आणण्याचं काम त्यांचा हक्काचा माहेरचा माणूस आशिष पवार करणार आहे. हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या शहरात करायचा असेल तर ८८३००३७४६२ या क्रमांकावर संपर्क करा.