बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (14:31 IST)

सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया म्हणाले, ही फडणवीसांची नवीन चाल आहे

anil deshmukh
सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर ते पीए मार्फत पैसे घ्यायचे सर्व पुरावे सीबीआय कडे असून देवेंद्र फडणवीसांना पत्र  लिहिलं आहे. असा आरोप केला आहे. त्या नंतर राजकीय वातावरण तापलं आहे. 
यावर अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, ही देवेंद्र फडणवीसांची चाल आहे. ते सचिन वाझे मार्फत माझ्यावर आरोप करत आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझे बद्दल मत दिले होते की हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून दोन खुनाच्या गुन्ह्यात सचिन वाझे यांना अटक केली. अद्याप सचिन वाझे खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. सचिन वाझे विश्वासपात्र नाही. आता त्याला हाताशी घेत देवेंद्र फडणवीस हे आरोप करत आहे. 

मी जे आरोप फडणवीसांवर चार पाच दिवसांपूर्वी केले होते की देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या समोर मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी प्रतिज्ञापत्र करून द्यावे. असा प्रस्ताव मांडला होता. मी हे जनतेसमोर आणले. आता फडणवीस सचिन वाझे यांच्या मार्फ़त माझ्यावर नवीन आरोप करत आहे ही त्यांची नवीन चाल आहे. असे अनिल देशमुख म्हणाले. 
Edited By- Priya Dixit