सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सोनाक्षीचे 'गुलाबी आंखे'

sonakshi singh
गुलाबी आखे ह्या राजेश खन्नाच्या गाण्याची आजही क्रेझ आहे. म्हणूनच नवीन नवीन गायक हे गाणे त्यांच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पुन्हा एकदा या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन सोनाक्षीच्या 'नूर' या आगामी चित्रपटात वापरण्यात आला असून 'गुलाबी आंखे' हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. एका दिवसात यूट्युबवर हे गाणे कित्केक लाख लोकांनी पाहिले आहे. सोनाक्षीच्या या गाण्यात तिचा हटके अंदाज पाहायला मिळतो. या गाण्याला अमाल मलिक यांचे संगीत असून हे गाणे तुलसी कुमार, यश नार्वेकर, अमाल मलिक या तिघाच्या आवाजातले आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी एका पत्रकाराची भूमिका करत असून तिचे आयुष्य कमसे चालते हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.