शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कपिल शोमधील सायकल 10 लाखांना विकली

मुंबई- लोकप्रिय कॉमेडी शो द ‍कपिल शर्मा शो मध्ये अॅक्शन स्टार चॅकी चोन आणि अभिनेता सोनू सूद ज्या सायकलीवर बसून स्टेजवर पोहोचले, ती सायकल त्याच शोमध्ये 10 लाख रूपयांना विकली गेली.
 
सेटशी संबंधित एका सूत्राने याबाबत माहिती देताना सांगितले की जॅकी आणि सोनू एका सायकलवर बसूनच सेटवर पोहचले. सोनू सायकल चालवत होता आणि जॅकी त्याच्या मागे बसला होता. मनोरंजन सुरू असताना कपिल शर्माने मदतीसाठी सायकलचा लिलाव करण्यासाठी बोली लावली. यावेळी प्रेक्षकांपैकी एक असलेले शेख फाजील यांनी ही सायकल 10 लाख रूपयांना खरेदी केली.
जॅकी आणि सोनू त्यांचा आगामी चित्रपट कुंग फू योगा या चित्रपटशच्या प्रमोशनसाठी शोच्या सेटवर आले होते. चीनेचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकत्याच केलेल्या भारत दौर्‍यादरम्यान दोन देशांदरम्यान तीन चित्रपटांचे सामंजस्य करार केले होते. कुंग फू योगा हा चित्रपट याच कराराचा एक भाग आहे.
 
या चित्रपटात दिशा पाटनी, सोनू सूद आणि अमायरा दस्तू हेदेखील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.