गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2024 (16:30 IST)

सावत्र वडिलांनी केली अभिनेत्रीची हत्या, दोषी आढळले 13 वर्षांनी मिळाला न्याय

court
2011 साली झालेल्या बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लैला खानच्या हत्येच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी अभिनेत्रींचे सावत्र वडील परवेझ टाक यांना दोषी ठरवले. या प्रकरणात परवेझ वर सावत्र मुलगी लैला, तिची आई आणि चार भावंडाची हत्या केल्याचा आरोप होता. हे प्रकरण फेब्रुवारी 2011 चे आहे. 

आरोपी परवेझ ह्याला लैलाचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या  गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले आहे. त्यांना किती आणि कोणती शिक्षा देण्यात यावर 14 मे रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे.परवेझ हे लैलाची आई सेलिनाचे तिसरे पती होते. नाशिकच्या इगतपुरीच्या बंगल्यात लैला, तिची आई सेलिना आणि चार भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.परवेझचा सेलिनासोबत संपत्ती वरून वाद झाला होता आणि नंतर त्याने रागाच्या भरात येऊन सेलिनाची हत्या केली नंतर लैला आणि चारही भावंडाना ठार केले. या हत्याकांडानंतर पोलिसांनी परवेझ टाक याला अटक केली होती. आणि मृतदेह बंगल्यातून अत्यन्त वाईट अवस्थेत बाहेर काढण्यात आले. 

लैलाखान हिचे नाव रेशमापटेल असू 2002 मध्ये कन्नड चित्रपट मेकअप मधून तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 2008 मध्ये तिने अभिनेता राजेश खन्ना सोबत वफा या डेडली स्टोरी या चित्रपटात काम केले. लोकांना हा चित्रपट आवडला नसून वर्षातील सर्वात वाईट चित्रपटात त्याची नोंद झाली. लैलाचे करिअर फारसे चांगले यशस्वी झाले नाही. नंतर 2011 मध्ये तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर परवेझला अटक करण्यात आली असून तो 12 वर्ष तुरुंगात होता. 
 
Edited By- Priya Dixit