सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (17:38 IST)

स्टार प्लसचा नवा शो 'चीकू की मम्मी दूर की'मध्ये सुधा चंद्रन यांचा कैमियो?

'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या मालिकेच्या प्रोमोने मालिकेबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
 
मालिकेचे निर्माते दर्शकांना आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का देण्याच्या तयारीत असून कदाचित आणखी एक दिग्गज कलाकार मालिकेत एंट्री घेताना दिसू शकेल. ताज्या बातमीनुसार निर्माते प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रनला आणण्याची योजना बनवत आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यासाठी ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री सुधा चंद्रन या मालिकेत एक कैमियो करताना पाहता येईल.
 
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, "सुधा चंद्रन टेलीविजन उद्योगातील एक लोकप्रिय चेहरा आहे ज्या आपल्या असाधारण अभिनय आणि नृत्यासाठी ओळखल्या जातात. या मालिकेत नृत्याचे सुंदर एलिमेंट असून सुधाजींचा नृत्याशी सरळ संबंध असल्याने, त्या निश्चितपणे यातील  कैमियोसाठी एक आदर्श विकल्प असतील. या बाबतत चर्चा सुरू असून दोन डांसिंग स्टार चीकू आणि सुधा जी एकत्र येतील, तेव्हा तो शानदार नजारा पाहणे अधिक मनोरंजक असेल."
 
तेव्हा, पहायला विसरू नका 'चीकू की मम्मी दूर की' 6 सप्टेंबर 2021 पासून, संध्याकाळी 6 वाजता, फक्त स्टार प्लस वर!