‘मुंबई डायरीज 26/11’चा अभिनेता मोहित रैनाने फ्रंटलाइन वर्कर्सच्या पार्श्वभूमीवर सांगितल्या आपल्या डॉक्टर वडिलांच्या आठवणी!

mohit raina
Last Modified मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (14:28 IST)
अमेझॉन प्राईम व्हिडिओची आगामी ओरिजिनल सीरीज ‘मुंबई डायरीज़ 26/11’ दर्शकांसाठी बहुप्रतीक्षित सीरीज आहे, याचे एक खास कारण आहे सीरीजमध्ये दिसणारी स्टारकास्ट ज्यांनी 26/11च्या आतंकवादी हल्ल्याची एक वेगळी बाजू दाखवली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने दर्शकांना या काल्पनिक, मेडिकल ड्रामा सीरीजसाठी उत्साहित केले आहे.

डॉक्टरांचा मुलगा असल्याने त्या दिवसांना उजाळा देत मोहित रैना म्हणाला, “एक मुलगा म्हणून मी खूप भाग्यवान राहिलो आहे कारण माझे वडील डॉक्टर आहेत. ते काश्मीरमधील गावांच्या बाहेरील भागात सेवेवर होते. दिवसाच्या अखेरीस, जेव्हा ते घरी येत असत, तरी प्रत्येक रात्री आपत्कालीन परिस्थितीमुळे आमचे दार अनेक वेळा ठोठावले जायाचे आणि त्यांना पुन्हा कोणाला तरी पहायला जावे लागत असे. दिवसाच्या अखेरीस देखील ते रुग्णांना तपासायला आणि त्यांना मदत करायाला नेहमीच सज्ज असत. ते जेव्हा परत येत, तेव्हा मी त्याच्या हावभावावरून समजत असे की ते रुग्णाला वाचवू शकले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण क्षमतेनुसार ते त्याला मदत करू शकले आहेत. आणि म्हणून मला वाटते की मी आधीपासूनच फ्रंटलाइन वर्कर्सची कामाप्रतीची उत्कटता अनुभवू शकलो आणि त्यांच्याकडून प्रेरित होऊ शकलो हे माझे सद्भाग्य आहे आणि कदाचित हे मालिकेत देखील उमटले आहे, ज्याचा भाग बनून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.”

निखिल अडवाणीद्वारे रचित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित ‘मुंबई डायरीज 26/11’ ही मालिका, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांची अप्रकाशित कथा सादर करते. या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.

‘मुंबई डायरीज 26/11’ चे प्रीमियर जागतिक स्तरावर अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 9 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

मराठी जोक : एवढ्या मार्कात दोन पोर पास झाली असती

मराठी जोक : एवढ्या मार्कात दोन पोर पास झाली असती
रमा रडत असते झम्प्या : काय झाल ,रमा का रडतेस ?

डिसेंबरमध्ये मनोरंजनाचा डबल डोस, जाणून घ्या कोणते चित्रपट, ...

डिसेंबरमध्ये मनोरंजनाचा डबल डोस, जाणून घ्या कोणते चित्रपट, वेब सीरीज रिलीज होणार
वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आणि हिवाळाही सुरू झाला. बहुतेक लोक हा महिना आनंदात ...

आफ्रिकन लोकही गात आहेत नोरा फतेहीचं गाणं, या दोन ...

आफ्रिकन लोकही गात आहेत नोरा फतेहीचं गाणं, या दोन भावा-बहिणींनीचे पहा व्हिडिओ
इंटरनेटच्या माध्यमातून बॉलिवूड गाण्यांची लोकप्रियता टांझानियापर्यंत पोहोचली आहे. सोशल ...

सोलो ट्रेकिंग आणि एडवेंचर ट्रॅव्हलिंगचा आनंद घ्यायचा असेल ...

सोलो ट्रेकिंग आणि एडवेंचर ट्रॅव्हलिंगचा आनंद घ्यायचा असेल तर उत्तराखंडचे रूपकुंड सर्वोत्तम
सोलो ट्रिप अर्थात एकट्याने प्रवास करणे ट्रेंडमध्ये आहे. तरुण लोक जगभरात ट्रेकिंगसाठी आणि ...

विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात सामील होण्यासाठी अटी आणि ...

विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात सामील होण्यासाठी अटी आणि नियम, विवाह ९ डिसेंबरला!
2021 मधील सर्वात भव्य विवाह सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ ...