शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (16:06 IST)

ऋतिक रोशनने शिक्षक दिनानिमित्त पॅराऑलिंपियन्स आणि शिक्षकांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!

पॅराऑलिंपिक खेळांमध्ये भारताने आतापर्यंत सर्वोच्च पदक प्राप्त केले असून संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. सुपरस्टार ऋतिक रोशन, ज्याने स्वतः एक शिक्षक (आनंद कुमार) यांची भूमिका साकारली होती आणि  आपल्या या चित्रपटासाठी 'सुपर 30' साठी चाहत्यांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली होती. शिक्षक दिनाच्या निमित्ताने पॅराऑलिंपिक खेळाडू आणि शिक्षकांना समर्पित एक अद्भुत संदेश शेअर केला आहे.
 
ऋतिकने आपल्या सोशल मीडियावर लिहिले, "'जीवनाला' सर्वोत्तम शिक्षक म्हणतात... तुम्हाला आपल्या आजूबाजूच्यां असाधारण व्यक्तिमत्त्वांना पहायचे आणि शिकायचे आहे. आपण #TeachersDay साजरा करतो आहोत, आणि मी #Paralympics 2021 मधील भारतीय स्पर्धकांना देखील एक मोठा 'शॉउट ऑउट' देऊ इच्छितो."
 
ऋतिक याविषयीच पुढे लिहितो, "तुमच्या या भागीदारीची प्रत्येक कहाणी, मैदानावरील प्रत्येक खेळाडू आणि मंचावरील विजेत्याला, स्वप्न बघणे, त्यावर विश्वास ठेवणे आणि ते प्राप्त करणे शिकवतात, या अजेय भावनेला सलाम। तुम्ही सगळेच जीवनासाठी उत्तम उदाहरण आहात. माझ्या जीवनाला स्पर्शण्यासाठी धन्यवाद! अभिनंदन!!❤️"
 
 
वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाल्यास, सिद्धार्थ आनंदच्या 'फाइटर'मध्ये पहिल्यांदाच ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांना एकत्र पाहण्यास चाहते प्रचंड उत्सुक आहेत.