1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (12:00 IST)

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी ऐकून तरुणी कोमात, रुग्णालयात दाखल

सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने त्याच्या कुटुंबासोबतच मनोरंजन जगत आणि त्याच्या चाहत्यांना हादरवून सोडलं. पण एक धक्कादायक बाब म्हणजे सिद्धार्थची एक तरुण फॅन हे दुःख सहन करु शकली नाही आणि तिला जबरदस्त मानसिक धक्का बसून ती अंशतः कोमात गेली असल्याची बातमी आहे.
 
सिद्धार्थचा मित्र डॉ. जयेश ठकारने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थची एक चाहती त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. त्यानं ट्विट करून अशा चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.