मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (16:06 IST)

शहनाज गिल बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थ शुक्लाला निरोप देण्यासाठी पोहोचली

बिग बॉस 13 विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर ब्रह्मकुमारी विधीनुसार ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू झाले आहे. सिद्धार्थ शुक्लाला अंतिम निरोप देण्यासाठी अनेक सेलेब्स स्मशानभूमीत पोहोचले आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची खास मैत्रीण शहनाज गिल प्रथमच स्मशानभूमीत हजर झाली.
 
शहनाज गिलची काही चित्रे आणि व्हिडिओ स्मशानभूमीतून समोर आले आहेत. या चित्रांमध्ये शहनाज बेशुद्ध दिसत आहे. तिचे डोळे सुजले आहेत आणि अश्रू वाहत आहेत.
 
एका व्हिडिओमध्ये शहनाज गिल सिद्धार्थ-सिद्धार्थला हाक मारत त्याच्या पार्थिव देहाकडे धावताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ खूप भावनिक आहे.
 
शहनाजसोबत तिचे वडील आणि भाऊही सिद्धार्थला अंतिम निरोप देण्यासाठी आले होते. तिची आईही तिथे पोहोचली. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज गिलची अवस्था वाईट  आहे.ही माहिती अभिनेत्रीचे वडील संतोख सिंह सुख यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली.
 
बातमीनुसार, शहनाज तिच्या वडिलांना म्हणाली, 'पापा , मी आता कसे जगणार. त्याने जग माझ्या हातात सोडले. शहनाजच्या वडिलांनी सांगितले की त्यांची मुलगी खूप वाईट स्थितीत आहे. ती म्हणाली, पप्पा, त्याने माझ्या हातात प्राण सोडले आहे. त्याने जग माझ्या हातात सोडले. मी आता कसे जगू, मी काय करू?
 
बातमीनुसार, शहनाज सिद्धार्थ आणि त्याच्या आईसोबत बराच काळ राहत होती रात्री  3:30 च्या सुमारास सिद्धार्थला काही अस्वस्थता जाणवली तेव्हा त्याने शहनाज आणि त्याच्या आईला याबद्दल सांगितले. त्याच्या आईने त्याला पाणी दिले आणि मग सिद्धार्थ शहनाजच्या मांडीवर झोपला.
 
यानंतर शहनाजही झोपली. शहनाज सकाळी उठली तेव्हा तिने सिद्धार्थला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती. सिद्धार्थची आई आणि त्याने खूप उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. त्याच्या आईने सिद्धार्थची बहीण आणि डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी घरी येऊन सिद्धार्थला मृत घोषित केले. त्यानंतर सिद्धार्थला रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याला 10.30 वाजता मृत घोषित करण्यात आले.