सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (14:19 IST)

सिद्धार्थ शुक्लाच्या बॉडीवर जखमांच्या कुठल्याही खुणा नाहीयेत

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. फिटनेसमध्ये आघाडीवर, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा, खतरों के खिलाडी आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थचे अचानक निधन अनेक शंका उपस्थित करत आहेत.
 
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सिद्धार्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल जेणेकरून सिद्धार्थने इतक्या लवकर जगाला निरोप का दिला याची नेमकी कारणे कळू शकतील.
 
सध्या सिद्धार्थच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी कोणतीही शंका व्यक्त केली नाही आणि मृत्यूला संशयास्पद म्हटले नाही. काल संध्याकाळी सिद्धार्थ त्याच्या आईसोबत पायी फिरताना दिसला होता.
 
पोलिसही सिद्धार्थच्या घरी पोहोचले आहेत जेणेकरून बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवता येईल. कोणतीही माहिती मिळू शकते. सिद्धार्थचे मित्र-नातलगं त्याचे घर आणि हॉस्पिटल गाठत आहेत. सिद्धार्थ मुंबईच्या ओशिवरा येथे राहत होता.
 
तसे, असे सांगितले जात आहे की सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काल रात्री औषध घेतले. त्यानंतर तो उठला नाही. या सर्व बाबी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड होतील.