शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (18:13 IST)

हॉलिवूडमध्ये दीपिका करते कमबॅक

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चार वर्षांनंतर हॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. अलीकडेच तिने आपल्या या अपकमिंग हॉलिवूड प्रोजेक्टची घोषणा केली आहे. अद्याप शीर्षक न ठरलेल्या क्रॉस कल्चरल रोँमंटिक कॉमेडी चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मितीदेखील दीपिकाच्या ‘का’  प्रॉडक्शन्स बॅनरअंतर्गत करण्यात येणार असल्याची घोषणा एसटीएक्सफिल्म्स मोशन पिक्चर ग्रुपचे चेअरमन अॅ्डम फोगेलसनद्वारे करण्यात आली आहे. या प्रोजेक्टबद्दल दीपिका म्हणाली, ‘का’  प्रॉडक्शन्सची स्थापना जागतिक मानांकन असलेल्या कंटेंटची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. 
 
एसटीएक्सफिल्म्स आणि टेम्पल हिल प्रॉडक्शन्ससोबतच भागीदारीचाही मला विशेष आनंद होत आहे. यावर बोलताना फोगेलसन म्हणाले, दीपिका जागतिक वलयांकित  कलाकारांपैकी एक आहे. ती एक प्रचंड प्रतिभाशाली व्यक्ती असून तिचा लौकिक आंतरराष्ट्रीय सुपरस्टार म्हणून वाढत आहे. अनेक इरोस इंटरनॅशनल चित्रपटांमध्ये अभूतपूर्व यश तिने मिळ‍वले असून आम्ही तिचसोबत आणि आमचे मित्र टेम्पल हिल यांच्यासोबत एक रोमँटिक कॉमेडी बनवण्यासाठी खूप रोमांचित आहोत. दीपिकाने2020 मध्ये ‘का' प्रॉडक्शन्सची सुरुवात केली. त्याअंतर्गत तिने 'छपाक' हा पहिला चित्रपट प्रोड्युस केला होता. तिने 'द इंटर्न' या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटात दीपिकासह अमिताभ बच्चन दिसणार आहेत.