सुझानकडून हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा
घटस्फोटानंतरही सुझानने सोशल मीडियावर हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकच्या 43 व्या बर्थडेला सुझानने इन्स्टाग्रामवर स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी नवीन वर्षाच्या स्वागताला हृतिक सुझानच्या कुटुंबीयांसोबत दुबईमध्ये दिसला होता. कंगना रनौतसोबत झालेल्या कायदेशीर लढाईतही सुझानने हृतिकचीच बाजू उचलून धरली होती. हृतिकचा ‘काबील’ हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत असून तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.