रविवार, 15 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (12:54 IST)

धडकन क्लायमेक्स मध्ये होणार होता सुनील शेट्टीचा मृत्यू, या कारणामुळे मेकर्सने बदलला निर्णय

सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचा 'धडकन' हा चित्रपट रिलीज होऊन 24 वर्ष झाली. या चित्रपटामध्ये शिल्पा ने एका श्रीमंत घराण्यातील मुलीची भूमिका निभावली होती. जी एका गरीब मुलाच्या प्रेमात पडते. नंतर तीच लग्न एका श्रीमंत मुलाशी करण्यात येत. 
 
या चित्रपटामध्ये गरीब मुलाची भूमिका सुनील शेट्टी याने निभावली होती. जो नंतर करोडपती बनतो. या चित्रपटामध्ये सुनील शेट्टीची भूमिका अमेरिकन नॉवेलिस्ट एफ स्कॉट फिटजरग्राल्डचा 'किताब 'द ग्रेट गॅटसबी' ने प्रेरित होता. या चित्रपट मध्ये उत्कृष्ठ अभिनय केला म्हणून सुनील शेट्टीचे खूप कौतुक करण्यात आले होते. 
 
'धडकन' याचा क्लायमेक्स हॅप्पी एंडिंग सोबत झाला. पण तुम्हाला माहित आहे का? पण हा सिन या चित्रपटाचा खरा भाग न्हवता. म्हणजे या चित्रपटाचा शेवट आनंदी नाही तर दुखी दाखवणार होते. पण याला बदलवण्यात आले. चित्रपट 'धडकन' च्या क्लायमॅक्स मध्ये सुनील शेट्टी यांचा मृत्यू होणार होता. पण मेकर्सला हे जाणवले की असे दाखवले तर प्रेषक नाराज होतील. 
 
तसेच याचा खुलासा करीत शिल्पा शेट्टी म्हणाली होती की, या चित्रपटाचे क्लायमॅक्स बदलण्यात आले. जेव्हा अंजली देव ला सांगते की, ती रामच्या बाळाची आई बनणार आहे तर हे ऐकून देव चा मृत्यू होतो. व चित्रपटाचा शेवट दुःखदायक होईल. यामुळे निर्मात्यांना वाटले की, चित्रपटाची एंडिंग आनंदी व्हायला हवी. म्हणून या चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला. 

Edited By- Dhanashri Naik