Suniel Shetty Birthday : सुनील शेट्टीला अभिनेता नव्हे तर खेळाडू व्हायचे होते,वयाच्या 31 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण
सुनील शेट्टी हा सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे जो त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि कामासाठी ओळखले जातात. 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
त्यांचे पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाउस आहे. त्यांनी पॉपकॉर्न मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली 'खेल – नो ऑर्डिनरी गेम' (2003), 'रक्त' (2004) आणि 'भागम भाग' (2006) सह अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने 1992 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी दिव्या भारतीसोबत 'बलवान' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
सुनील शेट्टीला कधीही अभिनेता व्हायचे नव्हते. क्रिकेटर बनण्याचे त्याचे स्वप्न होते, पण अभिनेता म्हणून त्यांचा लूक आणि फिटनेसमुळे त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याच्या संधी कमी मिळत होत्या. आज सुनील एक यशस्वी बिझनेस मॅन आहे. आज सुनील अनेक रेस्टॉरंट आणि प्रोडक्शन हाऊसचे मालक आहे.
कॉमेडीपासून ते ॲक्शनपर्यंत अनेक प्रकारचे सिनेमे त्यांनी केले, पण कॉमेडीमध्ये ते खूप हिट ठरले.
अभिनेता सुनील शेट्टीने 'चीटी' (1994), 'मोहरा' (1994), 'शास्त्र' (1996), 'कहार' (1997), 'धडकन' (2000), यासह अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत चमक दाखवली आहे.
'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी' (2002), 'कर्ज: द बर्डन ऑफ ट्रुथ' (2002), 'खेल - नो ऑर्डिनरी गेम' (2003), 'बाज: ए बर्ड इन डेंजर' (2003), 'मैं हूं' ना' (2004), 'आन: मेन ॲट वर्क' (2004), 'रुद्राक्ष' (2004), 'कॅश', 'नो प्रॉब्लेम' (2010), 'एनीमी' (2013), 'ए जेंटलमन' (2017) , 'स्काय फोर्स' (2024), 'वेलकम टू द जंगल' (2024) आणि 'कमांडो 4' (2025) आणि 'सिकंदर' (2025).या त्यांच्या कारकिर्दीतील काही गाजलेले चित्रपट आहे.
Edited by - Priya Dixit