बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 10 मार्च 2024 (15:38 IST)

सनी लिओनीला ‘नवरोबा’ची भुरळ

sunny leoni
Instagram
कन्नी या सिनेमाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा असून सिनेमाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्याने अनेकांना वेड लावले आहे. याच्या गाण्यांवर अनेक संगीतप्रेमी प्रेम करत आहे. या चित्रपटातील नवरोबा गाण्याने सनी लिओनीला भुरळ टाकली आहे. आणि लिओनीचा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
सध्या नवरोबा गाण्ययावरील अनेक रिल्स व्हायरल होत आहे. यातील हूक्सस्टेप देखील प्रचंड गाजत आहे. आता याची भुरळ बॉलिवूड ची अभिनेत्री सनी लिओनीला पडली आहे. 
सनीने हे नृत्य सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. सनी हे गाणं एन्जॉय करत असून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. 
कन्नी चित्रपटातील गाण्यामध्ये हृता मित्र असतानाही तिची नजर तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवऱ्याला शोधात आहे. ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवऱ्याची वाट बघून तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुलात ती नवरोबा शोधात आहे. हृताचा नवरा तिला मिळेल का याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 
 
कन्नी हा चित्रपट समीर जोशी यांनी लिखित -दिगदर्शित केले असून हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज, ऋषी मनोहर हे प्रमुख भूमिकेत आहे. तर सिनेमाची निर्मिती अमित भरगड, वैभव भोर, सनी राजांनी आणि गगन मेश्राम यांनी केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit