शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (16:03 IST)

सुशांतसिंगने 'या' दोघांना शेवटचे कॉल केले

Sushant Singh
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात अभिनेत्याच्या मोबाइल रेकॉर्डनुसार, त्याने शेवटचा कॉल रिया चक्रवर्ती आणि महेश शेट्टी यांना केला होता. पण दोघांनी सुशांतचा फोन उचलला नव्हता. आता या प्रकरणात पोलीस दोघांची चौकशी करणार  आहेत.
 
14 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता सुशांतसिंग राजपूत उठला. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता तो बहिणीशी फोनवर बोलला. साडेदहाच्या सुमारास सुशांत खोलीतून बाहेर पडला आणि ज्यूस घेतल्यानंतर परत रूममध्ये गेला. काही वेळाने जेव्हा नोकर दुपारच्या जेवणाबाबत विचारण्यासाठी गेला तेव्हा दार आतून बंद होतं. सुशांत दार उघडत नव्हता. एकत्र राहणाऱ्या मित्राने आणि नोकरांनी सुशांतला फोन केला पण त्याने फोन उचलला गेला नाही. यानंतर सर्वजण घाबरले.
 
जेव्हा सुशांतने खोली उघडली नाही तेव्हा किल्ली बनविणार्‍याला बोलविले गेले. त्याने दार उघडलं पण खोलीत फॅनला सुशांतचा मृतदेह लटकलेला पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. परंतु पोलिसांना सुशांतच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट किंवा इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.