सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (09:21 IST)

सुशांत सिंहला चाहत्यांकडून अनोखी श्रद्धांजली

कोरोना व्हायरसमुळे अभिनेता सुशांत सिंहचे चाहते त्याला एका अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. त्याच्या काही चाहत्यांचे फोटो व्हायरल होत असून आहेत ज्यात ते सुशांतचा चेहरा असणारा मास्क लावलेले दिसताय. या मास्कवर सुशांत सिंह राजपूतचे फोटो दिसतेय.

तर या फोटोसह चाहत्याने मास्कवर एक खास संदेशही लिहिला आहे. ”जिस्म से हारा हूं रूह तो सिर्फ एक परिंदा है, धड़कने चल रही हैं अभी भाई मेरी, अभी भी मेरे दिल में जिंदा है.”असे त्या संदेशात लिहिले आहे. सुशांतच्या चाहत्यांचे म्हणने आहे की, सुशांतला श्रद्धांजली वाहण्याचा हा एक मार्ग आहे, आणि अशाप्रकारचे मास्क इतर लोकांना देखील वाटण्याचा देखील आमचा प्रयत्न असणार आहे. सध्या हे सुशांतचे फोटो आणि अनोखा संदेश असणारे मास्क सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.