मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (14:14 IST)

अखेर सुशांत सिंग राजपूतचा फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

sushant singh rajputs
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबई पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. पोलिसांना सुशांतच्या अंतिम पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळाला आहे. यासाठी मुंबईतील पाच डॉक्टरांची टीम साइन केली (sushant singh rajputs final post mortem report)होती.
 
रिपोर्टनुसार, पोस्टमॉर्टमनुसार सुशांतच्या शरीरावर कोणताही संघर्ष किंवा  दुखापतींचा निशान सापडलेले नाहीत. त्याच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्यामुळे गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची नखेही स्वच्छ आढळली आहेत. रिपोर्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या आहे.