शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (07:37 IST)

सुशांतचा शेवटचा सिनेमा सिनेमागृहातच रिलीज करा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput suicide)याच्या अवेळी एक्झिटच्या धक्क्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. सुशांतचा शेवटचा चित्रपट असलेला 'दिल बेचारा' चित्रपटगृहातच प्रदर्शित केला जावा अशी मागणी चाहत्यांकडून केली जातेय.
 
पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी असल्याचं सांगत या चित्रपटाचं प्रदर्शन बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आलं होतं. सध्या चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले जाण्याची हवा आहे. पण, हा चित्रपट सिनेमागृहातच रिलीज करण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. २०१४ साली आलेल्या हॉलिवूडच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार' या चित्रपटाचा 'दिल बेचारा' हा चित्रपट रिमेक आहे. सुशांतचा ‘दिल बेचारा’(Dil Bechara)ही एक प्रेमकथा असून, त्यात संजना संघी त्याची नायिका आहे. हा चित्रपट जॉन ग्रीनच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.
 
सुशांतच्या आत्महत्येचं (sushant singh rajput suicide)नेमकं कारण अद्यापही समोर आलं नसलं तरी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीमुळं त्याच्यावर ही वेळ आली असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.त्यामुळं त्याचा ‘दिल बेचारा' हा चित्रपच मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करण्यात यावा, 'आम्हाला आमच्या हिरोला शेवटंचं मोठ्या पडद्यावर पाहयचं आहे', असं सुशांतच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. ८ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाउमुळं हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
 
३४ वर्षांचा सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्येत होता. यावर तो उपचारही घेत होता.छोट्या पडद्यावर 'किस देश में है मेरा दिल', 'पवित्र रिश्ता' या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर 'काय पो छे' सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'राबता', 'पिके', 'छिछोरे' या सिनेमांतून त्यानं आपली अभिनयक्षमता सिद्ध करून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं होतं