शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (22:04 IST)

‘झी5’ च्या ‘नक्सल ’ मालिकेच्या चित्रिकरणाला लवकरच सुरुवात

‘झी5’ने ‘नक्सल’ या दमदार अॅक्शन-थ्रीलरमधील कलाकारांची घोषणा केली आहे. राजीव खंडेलवाल (राघव), टीना दत्ता (केतकी), आमीर अली (केसवानी), श्रीजीता डे (प्रकृती) आणि सत्यदीप मिश्रा (पहन) हे कलाकार या मालिकेमध्ये दिसणार आहेत. या मालिकेच्या चित्रिकरणाला निर्माते लवकरच सुरुवात करणार आहेत. त्यासाठी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर योग्य आणि कठोर असे सुरक्षा उपाय योजले जाणार आहेत.
 
ऍक्शनने भरलेली ही आठ भागांची मालिका काल्पनिक कथेवर अवलंबून असून यात ‘नक्सल’ चळवळीविरोधात लढणाऱ्या एका योद्ध्याची कथा साकारण्यात आली आहे. राघवसाठी (राजीव खंडेलवाल) ही काळाच्या विरोधातील लढाई आहे. राघव हा एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सर्व आव्हानांचा सामना करत लढतो आहे. महाराष्ट्रातील दाट जंगलांपासून महानगरांपर्यंत सर्वच अंगे व्यापणारी अशी ही मालिका असून ‘नक्सल’ चळवळ या दोन्ही  वातावरणात कशी फोफावत चालली आहे, त्याचे चित्रण या मालिकेमध्ये घडणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहेत.