1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (18:18 IST)

सुशांतच्या आत्महत्येवर सलमानखानची पहिली प्रतिक्रिया

Salman Khan
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेतला आणि त्याने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून जबरदस्त वाद सुरू झाला आहे.यामध्ये  करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. मात्र या कठीण काळात सुशांतच्या कुटुंबीयांच्या व त्याच्या चाहत्यांच्या पाठीशी उभे राहा, अशी विनंती सलमानने त्याच्या चाहत्यांना केली आहे.सलमान ने  शनिवारी रात्री उशिरा त्याने हे ट्विट केलं आहे.
 
यामध्ये तो म्हणतो कि, ‘मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी सुशांतच्या चाहत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. त्याच्या चाहत्यांनी वापरलेल्या भाषेचा किंवा शापाचा विचार करू नका, मात्र त्यामागील त्यांच्या भावनांना समजून घ्या. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ती व्यक्ती गमावणे हे सर्वांत जास्त दु:खदायक असतं. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या चाहत्यांना साथ द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा,’ असं ट्विट सलमानने केलं आहे. चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. पुढील नुकसान होऊ नये म्हणून आता सावरासावर करत आहेत.