मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (17:18 IST)

अंकिताशी ब्रेकअप करुन खूप मोठी चूक केल्याचे सुशांतची भावना

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. सुशांतच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी सुरु आहे. नुकतीच पोलिसांनी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीची चौकशी केली. आता पोलीस मनोविकारतज्ञ डॉक्टर केरसी चावला यांचे स्टेटमेंट घेत आहेत. 
 
सुशातं सिंह राजपूत साधारण वर्षभरापासून नैराश्येत होता. साधारण ६ महिन्यांपूर्वी तो मला भेटला होता. रात्रभर मला झोप येत नाही आणि विचित्र विचार येतात असे त्याने सांगितले होते. रिया चक्रवर्तीच्या वागणुकीवर तो खुश नव्हता. तसेच अंकिता लोखंडेची त्याला आठवण येत असे. अंकिताशी ब्रेकअप करुन खूप मोठी चूक केल्याचे त्याला वाटतं असे. एकाच गोष्टीचा तो वेगवेगळ्या बाजुने विचार करत असे. तो त्याच्या नात्याबद्दल खुश नव्हता. असेही डॉक्टरांनी सांगितले. 
 
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही मोठा धक्का बसला. मंगळवारी अंकिता सुशांतच्या वांद्रे येथील राहत्या घरी पोहचली होती. अंकितासोबत आणखी काही जणही सुशांतच्या घरी गेले होते.