रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (16:21 IST)

मतदानासाठी आलेला भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह

राज्यसभा निवडणूकीत मध्य प्रदेशमध्ये मतदानासाठी आलेला भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.देशभरात काल राज्यसभेच्या 19 जागांवर काल मतदान घेण्यात आले. मध्य प्रदेशमध्येही राज्यसभेच्या तीन जागांवर मतदान झाले. या जागांवर भाजपाचे दोन आणि काँग्रेसचे एक उमेदवार जिंकले. भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी हे राज्यसभेवर जाणार आहेत. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह हे राज्यसभेवर गेले आहेत. 
 
दरम्यान या मतदानासाठी पटनामध्ये आलेले भाजपाचे जावद मतदारसंघाचे आमदार ओमप्रकाश सकलेचा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. 
 
सकलेचा यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांच्या पत्नीला ताप आला होता. यामुळे त्यांनी दोघांचीही चाचणी भोपाळच्या एका खासगी लॅबमध्ये केली होती. या चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी रात्रीच पॉझिटिव्ह आला आहे. याच दिवशी राज्यसभेचे मतदान झाले. जावद विधानसभा मतदारसंघ नीमच जिल्ह्यात येतो. सकलेचा हे 16 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी भोपाळमध्ये आले होते.