शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (12:15 IST)

कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल या भितीने IRS शिवराज सिंह यांनी केली आत्महत्या

कोरोना व्हायरसमुळे देशभरात 9 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यामध्ये जे लोक कोरोनाच्या भितीमुळे जगू शकले नाहीत त्यांचा समावेश नाहीय. म्हणजेच कोरोनाच्या भितीने आत्महत्या करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. असेच एक प्रकरण दिल्लीमध्ये घडले आहे. भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्याने  आत्महत्या केली आहे. 
 
इंडियन रेव्हेन्यू सर्विस ऑफिसर शिवराज सिंह असे त्यांचे  नाव असून ते आयकर विभागामध्ये अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कारमध्ये अॅसिडसारखा पदार्थ प्राशन करून  जीवन संपवले. त्यांच्या कारमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी 'माझ्यापासून कुटुंबाला कोरोनाची लागण होईल, त्यांना कोरोना देऊ शकत नाही. यामुळे आत्महत्या करत आहे.'' असे लिहिले आहे. 
 
एका आठवड्यापूर्वीच त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र, रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, तरीही त्यांना भिती वाटत होती की त्यांच्यामुळे कुटुंबाला कोरोनाची लागण होईल, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
 
प्राथमिक तपासात त्यांनी अॅसिड पिल्याने मृत्यू झाल्याचे दिसत आहे. ते सध्याच्या परिस्थितीमुळे खूप निराश झाले होते. पोस्टमार्टेम केल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला.