बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (16:20 IST)

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले

मुंबईत ६५ वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल गफ्फर शेख असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी अब्दुल गफ्फर शेख वडाळा येथील रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. दहा दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयात नोकरी मिळाली होती. त्याच्याकडे संशयित रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्याचीही जबाबदारी होती.
 
मेहर लांबेराज यांची यांच्या आईला कॅन्सर असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करायचं होतं. मात्र कोरोनाची चाचणी न केल्यामुळे त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल करुन घेत नव्हते. यामुळे मेहर यांनी शेख यांच्याशी संपर्क करत आईची कोरोनाची चाचणी करायला घरी बोलावलं. शेख मेहर यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची स्वॅब टेस्ट केली. या टेस्टचे तब्बल ६ हजार रुपयेही घेतले. मात्र शेखने कोरोना रिपोर्ट आणून दिला नाही. मेहर यांनी शेखशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर शेखने मेहर यांच्या आईचे रिपोर्ट त्यांच्या काकांकडे सुपर्द केले. मात्र त्या रिपोर्टमध्ये पूर्ण माहिती नसल्याचे मेहर यांच्या लक्षात आलं.