1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जून 2020 (10:11 IST)

मुंबईत मोदी सरकारने अत्यावश्यक सेवेसाठी ट्रेन सुरु कराव्या: जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad asks to resume Mumbai local trains for emergency services
मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
 
रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर वर राहतात त्या शिवाय कामावर रुजू होऊ शकत नाही आणि त्या मुळे रुग्ण सेवा व्यवस्थित होत नाही. म्हणून मोदी सरकारनी मुंबईत ट्रेन काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करायला हव्यात. अशी मागणी आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
 
आव्हाड हे सतत ट्विटरद्वारे जनतेच्या संपर्कात असतात आणि खोड्या वेळापूर्वीच त्यांनी केरळमध्ये हत्तीणीचा मृत्यूच्या घटनेवर वेगळ्या प्रकारे शोक व्यक्त केला. ज्यात लिहिले होते की नफ़रत की दुनिया को छोड़कर प्यार की दुनिया में  खुश रहना मेरे यार ... #keralaelephant plz forgive us.