शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (09:22 IST)

निसर्ग चक्रीवादळ: मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने ३ जून रोजी मुंबईहून सुटणाऱ्य़ा विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मध्ये रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
 
मुंबईच्या आसपासच्या मार्गावरून जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या मार्गातदेखील बदल करण्यात आली आहे. 
 
३ जून व ४ जून रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये व उद्योग बंद राहतील, तसेच दोन दिवस घरातच सुरक्षित थांबण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.