शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 31 मे 2020 (11:10 IST)

भारतीय लष्कराची माहिती मेळविण्याचा प्रयत्न, Spy Network वर छापेमारी

मुंबईतील चेंबूर भागात बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची जम्म-काश्मीरमधली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या Spy Network वर छापेमारी करण्यात आली आहे. लष्कराचं एक पथक आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवरुन भारतीय लष्कराची जम्मू काश्मीरमधील माहिती व सैन्यदलाच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. Voice over Internet Protocol या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता.
 
या छापेमारीदरम्यान पोलिस आणि लष्कराच्या पथकाने बऱ्याच महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत. ३ कार्यरत असलेली चायनिज सिमकार्ड, याव्यतिरीक्त १९१ सिमकार्ड, लॅपटॉप, मॉडम, अँटीना, बॅटरी आणि कनेक्टर असा माल पथकाच्या हाती लागला आहे. चायनिज सिमकार्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आवाज बदलून Voip तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय लष्कराची माहिती मिळण्याचा प्रयत्न सुरु होता अशी माहिती  एका वृत्तसंस्थेने दिली आहे.