गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (09:42 IST)

दिलासा : धारावीत एकही मृत्यू नाही

मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील धारावीमधून बुधवारी एक थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून सातत्याने धारावीमध्ये रुग्ण सापडत आहेत. धारावीमध्ये करोना व्हायरसचे १८ नवीन रुग्ण सापडले. पण मागच्या २४ तासात करोनामुळे धारावीत एकही मृत्यू झालेला नाही.
 
– बुधवारी राज्यात २,१९० नवीन करोना रुग्णांची नोंद झाली.
– महाराष्ट्रात करोनाचे एकूण रुग्ण ५६,९४८ आहेत. त्यात ३७,१२५ अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.
– ९६४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत १७,९१७ करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
– दिवसभरात १०५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १८९७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– मुंबईत ३४,०१८ करोना रुग्ण आहेत. त्यात ८४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २४,५०७ अजूनही अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.