सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 जून 2020 (13:20 IST)

सुहाना मॉम गौरीसोबत पावसाचा आनंद घेत आहे, व्हायरल होत आहे तिचे फोटो

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियाची फेवरिट आहे. सुहानाचे फोटो नेहमीच तिच्या चाहत्यांना आवडतात. आता सुहानाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या आई गौरी खानसोबत पावसाचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.
 
सुहानाच्या फॅन क्लबकडून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले गेले आहेत. चित्रांमध्ये गौरी आणि सुहाना मन्नतच्या बाल्कनीत बसलेल्या दिसतात. गौरी चहा पित आहे, तर सुहाना टेबलावर पाय ठेवून तिच्याकडे पाहत आहे. हे फोटो केव्हा घेतले हे स्पष्ट नसले तरी ते पावसाचा आनंद लुटताना बघू शकतो. सुहानाने मागील महिन्यात तिचा 20 वा वाढदिवस साजरा केला होता, ज्यांचे फोटो तिने शेअर केले होते.

सुहाना न्यूयॉर्कमध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यास करत आहे. पण सध्या लॉकडाउनमुळे कुटुंबासमवेत मुंबईत आहे. लॉकडाऊनमध्ये सुहानाने ऑनलाईन बेली डान्सचे वर्गदेखील घेतले, ज्यांचे व्हिडिओ आणि फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील पहिले फोटो 2019 चे आहे, ज्यात सुहाना डान्स ट्रेनरसोबत दिसली आहे. दुसरे चित्र लॉकडाऊन दरम्यान आहे जेव्हा ती ऑनलाईन प्रशिक्षण घेत होती.