सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 1 जून 2020 (09:53 IST)

आजापसून धावणार 200 गाड्या, जाणून घ्या नियम

लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर म्हणजे सुमारे सव्वा दोन महिन्यांनंतर रेल्वेची सेवा आता पूर्वपदावर येत आहे. 1 जून पासून रेल्वेच्या देशभरात 200 रेल्वे गाड्या धावणार आहे. यासाठी बुकिंगही काही दिवसांपूर्वीच सुरू केलं गेलं होतं. आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे परंतू प्रवास करण्यासाठी काही नियम पाळणे सक्तीचं करण्यात आले आहे.
 
आजापासून सुरु होत असलेल्या सेवेच्या या पहिल्या टप्प्यात देशातल्या निवडक मार्गावर 200 रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्याचा टाईम टेबलही रेल्वेने प्रसिद्ध केला आहे. या गाड्यांचं बुकिंग 21 मे रोजी रेल्वेने सुरू केलं होतं. आरक्षणाचा कालावधी आता 30 दिवसांवरून 120 दिवस करण्यात आला आहे. 
 
प्रवासाचे नियम-
प्रवासा दरम्यान प्रत्येकाला मास्क वापरणं सक्तीचं आहे.
रेल्वे स्थानकावर प्रवासाच्या सुरूवातीला आणि उतरल्यावर स्क्रिनिंग होणार आहे.
रेल्वे तपासणीसांना सुरक्षेसाठी PPE किट देण्यात येणार आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचं पालन सक्तीचं करण्यात आलं आहे.
आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी प्रवास टाळावा असं आवाहन रेल्वेने केलं आहे.
 
या आधी रेल्वेने मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. 24 मे रोजी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशातली रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती.