रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (16:11 IST)

फेसबुक लाइव्हद्वारे होणार योगदिन साजरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा जागतिक  योगदिन फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पतंजली योगपीठाच्या महिला केंद्रीय  प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली.
 
येत्या  21 जून रोजी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा केला जाणार आहे. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावर्षी रविवार, 21 जून रोजी हा योग दिवस कोरोनामुळे सामूहिकपणे साजरा करता येणार नाही. पण या महाारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे. म्हणून हा योग उत्सव पतंजली योग समिती व वेगवेगळ्या योग संघटनेच्या माध्यमातून  फेसबुक लाइव्हच्या मदतीने घरीच साजरा करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत पतंजली योग समिती  महाराष्ट्रद्वारा प्रत्येक जिल्ह्यातून फेसबुक लाइव्हद्वारा हा कार्यक्रम होणार आहे. आयुष मंत्रालाच्यावतीने स्वामी रामदेव यांच्या सान्निध्यात हरिद्वारवरून हा  कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आस्था चॅनल तसेच फेसबुक लाइव्हद्वारे कार्यक्रम पाहून आपण घरीच योग करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा, असे आवाहन अळ्ळीमोरे यांनी केले आहे.