रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (13:04 IST)

मुद्दे आणि गुद्दे सगळचं सुशांत......

सुजाणपणे शांत राहणाऱ्यांना आणि अजाणपणे अशांत करणाऱ्यांनासुद्धा... फोटोमधला शांत जोकर प्रतिकात्मक आहे...त्याला अशांत करू नका.... जोकर हसराच बरा असतो नाहीतर परिणाम माहित आहेतच तुम्हाला...
 
आता सगळं सुशांत वाटतं आहे का? की अजूनही बाकी आहे बरच काही? का ही फक्त नांदी आहे सोकावणाऱ्या काळाची....???
 
मुद्दा बऱ्याच जणांनी मांडला पण आता खरतर शाब्दिक गुद्द्यांची भाषा वापरावी लागेल...आणि वेळ आलीच तर...
अरे, एवढ्यातच अशांत झालात...आता तर मी पण कुठे सुरुवात केली आहे तुमच्यासारखीच...पण मी म्हणजे तुम्ही नक्कीच नाही कारण तुमच्यासारख मला वागता, बोलता, हसता आणि तुमच्यासारखी आणि तुमच्यासारख मला मरवताही येत नाही...कोणालाच...
 
'माझे मुद्दे (गुद्दे) तुम्हाला लागतील कधी ना कधी...'ह्या वाक्याचे हवे तेवढे अर्थ काढा पण मी येणाऱ्या काळाच्या गरजेनुसार बोलत आहे फक्त (सध्या)...फार मोठं तत्वज्ञान नाहीये पण लॉ ऑफ युनीव्हर्स प्रमाणे तुमच्या आचार, विचार, कृतीप्रमाणे जे तुम्ही प्रक्षेपित कराल ते गुरुत्वाकर्षण प्रक्रियेद्वारे गुणाकार (multiplied) होऊन आणि अधिक भव्य (magnified) होऊन तुमच्याकडेच परतावा करेल...आता काय वागलात ह्याचा विचार तुमचा तुम्ही करा... Negative का Positive ?
 
आपली इंडस्ट्री, खरंच म्हणायची का प्रत्येकाने आपली?
बरं रागावू नका, तर आपली इंडस्ट्री, खूप अभिमानास्पद प्रवास करत आलिये आजपर्यंत... खूप स्थित्यंतर पाहिली आपण पिढ्यानपिढ्या...इथे रक्ताच पाणी केलेल्या प्रत्येक कलावंताला माझा मानाचा मुजरा...पण आज मी कौतुकास्पद बोलायला नाही आणि टीकेचे फक्त बोट नाही तर अनेक थपडा किंवा अनेक गुद्दे मारायला हा लेखन प्रपंच करतो आहे...
 
कलाकाराचे मग तो अभिनेता असेल किंवा तंत्रज्ञ किंवा दिग्दर्शक अथवा निर्माता असेल त्याचे मानसिक खच्चीकरण कसे आणि कोणत्या प्रकारे होते हे खालील मुद्द्यांवरून कदाचित तुम्हाला कळेल, पटेल की नाही माहीत नाही....पण लागू वरील नमूद सर्वांनाच आहे
 
लॉबी(लोभी) - कितीही नाकारले तरी इथे लॉबी(लोभी) आहेच आणि तू मेरी खुजा मै तेरी खूजाता हुं तत्वावर ह्यांचे व्यवहार चालू असतात... ह्यात 'आउट सायडर' ला प्रवेश नाही... कितीदा फायनल शॉर्ट लिस्टिंग होऊन नंतर ह्यांच्या लॉबी मधला सिलेक्ट झालेला मी स्वतः अनुभवला आहे...आणि इथे मी लीड रोल बद्दल बोलत आहे(फिल्म, सीरियल आणि नाटक)... हा हा हा छोट्या रोल करणाऱ्यांची तर गणतीच नाही...ताई, दादा, मावशीच काय काही जणांनी ह्यासाठी आईसुद्धा बदलली आहे...बाप तर अनेक आहेतच... अहो खरंच... शपथ...
कलाकार नंतर आधी चाटूकार लोकांना प्राधान्य... नंतर हॅमर करून लोकांना त्या लॉबीकाराची सवय लावता येते हो हळू हळू आणि प्रेक्षकसुद्धा बेमालूम ती लावून घेतात... Wow What a Skill... पण किती दिवस असा संसार सुखाचा कराल तुम्ही... खोट्या नात्यांसोबत? आपल्या कथेसारख्या? अहो लॉबी नाहीये आमची पण आमची अॅक्टिंगची हॉबीच पुरेशी आहे तुमच्यासाठी...आज गुद्दे मारतोय उद्या टॅलेंटची लाथ मारून नाही दरवाजा तोडला तर हाडाचा कलावंत नाही...(नसीर भाईंचे फटा पोस्टर निकला हीरो किंवा अमिताभ ची लाथ मारून एन्ट्री स्मरावी)... तर मानधन कमी देण्यापासून ते मानधन न देण्यापर्यंत किंवा देण्यास उशीर करेपर्यंत, रोल छोटा करण्यापासून replacement पर्यंत, लॉबी करून स्वतः च्या तंत्रज्ञ टीमला कामे मिळवून देणे, प्रॉडकशन्सच्या पैशाचा अपव्यय किंवा खर्चाचा तपशील योग्य न देणे , चिरीमिरीसाठी विवेक विकणे, दिग्दर्शकालाच गुंडाळणे ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टीमध्ये ही लॉबी सक्रिय असते... लक्षात ठेवा ही कीड एका चांगल्या अभिनेत्यालाच नाही तर तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि निर्माते ह्या सगळ्यांना एक दिवस पोखरून काढेल...आज अनेक श्रीमंत किंवा नवोन्मेश निर्मात्यांना वाटत असेल किंवा दिग्दर्शकांना सुद्धा की मी माझ्या लॉबीमध्ये सुरक्षित आहे तर लक्षात ठेवा ही लॉबी जशी आज बनली तशी उद्या दुसरी बनून तुम्ही एकटे कधी पडाल कळणार देखील नाही... त्यापेक्षा चांगल्या टॅलेंटला खरंच संधी द्या तो सोन करेल तुमच्या पैशाचं आणि मेहेनतीच...सदा सावध तो सदा सुखी...
 
गोरेपणा आणि पुणेकर- ह्याच्या इतकं फालतू parameter मला आज पर्यंत दिसल नाही... रफ, रस्टिक, गव्हाळ नाही चालत इथे सहसा, अपवाद आहेत पण ते लॉबी शी Related आहेत बऱ्याच अंशी... तरीसुध्दा बरेच जण आहेत ज्यांनी त्याही परिस्थितीत स्वतः ला सिद्ध केलंय... सलाम तुम्हाला पण गव्हाळ वर्णामुळे मला बऱ्याचदा ऑडिशन्स ची सुद्धा संधी नाही दिलीये हो, नाही तक्रार कशाला करतोय-तिथे वाद करून स्वतःचे भाषेवरील प्रभुत्व आणि अभिनयाची जाण सिद्ध करून दाखवली पण उपयोग नाही होत कारण वाद करून ऑडिशन द्यायला दिली तरी तुमचा निकाल आधीच लागलेला असतो...आणि सिलेक्ट झाला लोभी पांढऱ्या...
एका exe.producer ने तर मला पुण्याची लाट आलीये रे लाट... ह्या भाषेत उत्तर देऊन मी तुला तू मुंबईकर आहेस म्हणून निवडू नाही शकत असे परस्पर सांगितले होते...असतील पुणेकरांचे उच्चार शुद्ध आणि अभिनंदनच आहे त्या गोष्टीचे पण इतर जिल्ह्यातल्या कलाकारांचे उच्चार तसे नसतील हा ग्रह मनात का? गोरेपण आणि पुणेकर हे काय निवडीचे निकष आहेत का??
 
NSD,FTII,MTA,ललित कला इति. विरुद्ध राज्य नाट्य स्पर्धा हौशी कलाकार - वरील नमूद संस्था,त्यातील शिक्षण पद्धती , तिथून आलेले आजवरचे कलाकार ह्याबद्दल नि:संशय आदर आहे...पण ह्यामध्ये शिकायला न मिळालेले सुद्धा हजारो उत्तम कलाकार आहेत... NSD passout कलाकाराने माझ्या समोर अभिनय आणि वैचारिक चिंतन ह्या दोन्हीमध्ये माती खाल्ल्याची माझ्या अनुभवातील एक आठवण आहे...चुका होतात माणसांकडून, पण तुम्ही आधीच institute वाल्यांना प्रिविलेज दिलेलं असतं, पण राज्य नाट्य ने काय कमी कलाकार दिले का? तिकडे बघायचा दृष्टीकोनच विचित्र आहे... तो काही रिकामटेकड्या लोकांचा अड्डा नाही रंगकर्मींचे मंदिर आहे ते... बऱ्याचदा नाटक किंवा सीरियल, सिनेमामध्ये अच्छा तू ह्या institute मधून आहेस का? अरे मग हा चांगलाच असेल...अरे हो मित्रांनो असेलच चांगला (कदाचित) पण दुसरा जो इन्स्टिट्यूट मधला नाही तो वाईट किंवा चांगला नाही असं गृहीत तरी नका धरू...१०-१०वर्ष फक्त राज्य नाट्य मध्ये हौशी (नोकरी करून) काम करून व्यावसायिक नट किंवा तंत्रज्ञ व्हायची स्वप्न किती हजारोंनी पाहतायत ह्याच्या आकड्यांचा अंदाज फक्त प्रवेश अर्ज भरणाऱ्या नाटक समुहांच्या संख्येवरून तरी लावा रे... एका नाटकात ऑन अँन अँव्हरेज ७ जणांची जरी टीम गृहीत धरली तरी महाराष्ट्रभरातून काही हजार जण प्रतिवर्षी आहेत जे प्रयत्नशील आहेत... आणि तुम्ही एका क्षणात institute आणि तद्दन निकष लावून निकाल लावता? सर्वांना काम नाही देता येणार मान्य पण निदान ऑडिशनची समान संधी द्या एवढंच सांगतोय...
 
Casting Couch - मूर्ख माणसं हा विषय चवीने चघळतात. आधी स्त्रियांपूर्ता मर्यादित होता आता बेसुमार झालाय... सॉरी पुरुषांना नो डिस्काउंट... आधीच लागलीये त्यात अजुन थोडी (वाट) ह्या भावनेने हे पाऊल उचलले जाते...पण ह्यात तुम्ही जसे रगडले जाता तसेच अनेक उत्तम कलाकारांचे भविष्य आणि वर्तमान भरडले जाते...तुम्हाला कदाचित इप्सित यश मिळते पण तुमचे अनुकरण करणाऱ्या प्रत्येकाला ते मिळतेच असे नाही... आणि हे यश नाही तुमच्या स्वत्वाच आणि तुमच्या आई वडिलांच्या संस्कारांच अपयश आहे हे कायम लक्षात ठेवा. किती depression आणि अबोर्शनच्या, सॅक्शुअल हर्रसमेंटच्या केसेस ऐकायला मिळतात ह्याला काही गणतीच नाही... मी टू उदाहरण आहेच ना डोळ्यासमोर... नाही म्हणू शकत नाही तुम्ही? एवढी घाई झाली यशाची आणि पैशाची की दुसऱ्याला पण ह्या खाईत सहज ढकलून देता तुम्ही? लाज नाही वाटत...हाह...नसेलच कदाचित... वाटायला ती असली पाहिजे ना तुमच्याकडे... तुम्ही लाजेलासुद्धा मधुर संगीतात झोपवता...आणि मग नागवता सच्च्या कलाकाराला...कारण असते तेरी भी चूप और मेरी भी...पण आता नाही....आता नाही...
 
Coordinators - मनापासून प्रामाणिक आणि दुसऱ्याचे नुकसान न करता काम करणाऱ्यांनी प्लीज हा मुद्दा इग्नोर करावा. ह्या जातिविषयी मला मनःपूर्वक आणि अपार चीड आहे. मी फक्त फसवणाऱ्या लोकांबद्दल बोलत आहे...हे म्हणजे तरस(त्रास)... कामाचे आमिष दाखवून लुटणारे लुटारू... मानधनाचे मृग दाखवणारे मारीचं... हातावर पोट असणारे कलाकार ह्यांच्यामुळे होतात बरबाद... उत्तर द्यायला हे बांधील नाहीत आणि production वाले तुम्हाला ह्यांच्याकडून आला असाल तर तुम्हाला उभ पण नाही करणार... ह्यांच्या गळाचा मासा कधीच होऊ नका...थोडा Patience ठेवा, काम करत रहा आणि एखाद्या चांगल्या संघटनेच कार्ड मात्र नक्की बनवून ठेवा, त्याचा नक्कीच उपयोग होतो...ह्या कार्डाच्या नादात सुद्धा ह्यांच्या आमिषाला बळी पडू नका... जरा स्वतः चा रिसर्च करा...आणि थोडी जास्त मेहनत...जी तुम्ही घेतच आहात...
 
पोर्टफोलिओ बनवून देणारे, व्यसन जडवणारे पेज ३ पार्टी निमंत्रक आणि काही घराणेशाही लॉबीकारांना सविनय सादर...आणि हो हे फक्त आमच्या नाही तुमच्याही सगळ्याच इंडस्ट्रीज मध्ये होत...सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना समर्पित...
 
माझ्या सुज्ञ मित्रांनो अनेक मुद्दे (गुद्दे) आहेत, काही तुम्ही पण हाणा ह्या पोस्टच्या कमेंटमध्ये...आणि पटलं तर ही पोस्ट जास्तीत जास्त शेयर करा...
 
एक ना अनेक असे बरेच सरडे, तरस आणि अजगर आहेत इथे सर्वांना माझा एकच थेट प्रश्न आहे,
अजून किती आणि कशा कशा प्रकारे तुम्ही कलाकाराचे असे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करत राहणार आहात...? हे सगळं येणार तुमच्याकडेच परत... प्रॉमिस... मी केलीय कदाचित सुरुवात... सुशांतपणे 
 
और हम तो सब की केहके लेंगे.... उसमे क्या है?????
 
प्रिय सुशांत, आम्ही नाही गप्प बसणार ना सहन करणार आणि ना आत्महत्या करून ह्या लोकांना अस जिंकू देणार...तू गेलास पण आमच्यातला सुशांत जीवंत करून गेलास...
 
अभिषेक अरुण आरोंदेकर
अभिनेता, लेखक, अभिवाचक