गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. फादर्स डे
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (14:13 IST)

छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती

father's day
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं...
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड...
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा...
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा...??
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते. पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही..!!