बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified गुरूवार, 4 जून 2020 (16:39 IST)

अशोक चव्हाण झाले कोरोनामुक्त

काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून अशोक चव्हाण यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर तब्बल आठवडाभरानंतर अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे.
 
२४ मे रोजी अशोक चव्हाण यांचा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर चव्हाण यांना रुग्णवाहिकेने नांदेडवरून मुंबईत आणण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्री योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत.