मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 25 मे 2020 (09:27 IST)

माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण कोरोनाबाधित

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईत उपचारांसाठी आणले जाणार असून ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५० हजरांचा टप्पा पार केला आहे.  
 
चव्हाण हे गेल्याच आठवड्यात मुंबईहून नांदेडला गेले होते. तेथे त्यांची चाचणी केली असता अहवालात संसर्ग झाल्याचे निषन्न झाले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नसल्याचे समजते आहे. परंतु त्यांनी वयाची साठी ओलांडली असून त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईला हलविण्यात येणार आहे.
 
दरम्यान, चव्हाण यांच्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली होती. काही दिवसांपूर्वीच ते कोरोनावर मात करून घरी परतले.