शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (11:18 IST)

सोनाक्षीने टि्वटर अकाउंट केलं डिअ‍ॅक्टिवेट

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती टि्वटर, इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. पण आता सोनाक्षीने तिचं टि्वटर अकाउंट डिअ‍ॅक्टिवेट केलं आहे. सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर स्पष्ट केलं की ती टि्वटरवर नाहीये. यासंबंधीचा एक स्क्रिनशॉट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला.

यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''आग लगे बस्ती में... मैं अपनी मस्ती में! बाय ट्वीटर' सोनाक्षीने टि्वटरवरील जो स्क्रीनशॉट शेअर केला त्यात लिहिले होते की, 'स्वतःची मनःशांती वाचवण्यासाठी मी स्वतः ला नकारात्मकतेपासून वाचवत आहे. याच्यासाठी टि्वटरपासून स्वतःला दूर केलं आहे. चला..  मी जाते.. मी माझं टि्वटर अकाउंट डिअ‍ॅक्टिवेट करत आहे.' ही पोस्ट इन्स्टाग्रावर टाकल्यानंतर तिने काही वेळानंतर टि्वटर अकाउंट डिअ‍ॅक्टिवेट केलं. यासोबतच तिने इन्स्टाग्रामवरील कमेन्टही बंद केल्या आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर  सोनाक्षी सिन्हाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.