मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (09:48 IST)

फडणवीस यांनी दुसऱ्याच ट्विटवरून केली टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच हल्लाबोल सुरु केला आहे. देवेंद्र फडणवीस  यांनी आधी अभिनंदनाचं ट्विट केल्यानंतर दुसरं ट्विट थेट टीका करणारं केलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या किमान समान कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं.
 
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या”!