मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (16:36 IST)

मी मंत्रीपदाची शपथ घेणार : भुजबळ

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राष्ट्रवादीचे जे दोन आमदार निवडले आहेत, त्यात माझे नाव आहे आणि मी सायंकाळी शपथ घेणार आहे. असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील महात्मा फुले स्मारक समताभूमी येथे आदरांजली अर्पण करण्यासाठी ते आले होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,  अजितदादांनी परत यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन ते परत आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आगामी काळात शरद पवार त्यांना जी काही जबाबदारी देतील ती ते निश्चितपणे पार पाडतील. आता तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.