सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (15:50 IST)

शपथविधी सोहळा, राज ठाकरे येणार

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. शिवाजी पार्कवर अर्थात शिवतीर्थावर शपथविधी सोहळा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज होणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन केला. 
 
या फोनवरून राज ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण दिले आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी यांनी दिलेल्या निमंत्रणाला त्वरीत उत्तर दिले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे आपली या शपथविधीला उपस्थिती दर्शवतात की नाही, या याबाबत अस्पष्टता होती. त्यामुळे राज ठाकरे या शपथविधीला हजर राहणार की नाही? याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. मात्र आता राज ठाकरे या शपथविधीला हजेरी लावणार आहेत.