प्रथमच ठाकरेविरहीत 'सामना'
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे. 'सामना'ची जबाबदारी कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊतांकडे सोपवण्यात आलीय. त्यामुळे आजचा 'सामना' प्रथमच ठाकरेविरहीत 'सामना' आहे. वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार वृत्तपत्रातील मजकूराची जबाबदारी संपादकाची असते. त्यानुसार प्रत्येक वृत्तपत्राला आपल्या संपादकाचे नाव वृत्तपत्रात छापणे बंधनकारक आहे.
कालपर्यंत 'सामना'च्या मजकूराची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर होती. आज मात्र सामनाच्या वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार ही जबाबदारी आता संजय राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनाप्रणीत महाविकासआघाडीचे सरकार आज स्थापन होत आहे. त्यामुळे 'सामना'ने महाराष्ट्र धर्माचे सरकार असे या सरकारचे वर्णन केले. पण त्याचवेळी भाजपलाही जोरदार टोले दिलेत.