नेहाचा सोशल मीडियाला रामराम!
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने या जगाचा निरोप घेऊन आता जवळपास एक आठवडा उलटला आहे. एकीकडे बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे नैराश्य आल्यामुळे त्याने जीवन संपवले, अशी चर्चा आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत आहेत.
त्यातच प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने सोशल मीडियामधून काढता पाय घेतला आहे. मात्र तिने लिहिलेल्या पोस्टकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता तिने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिने ही माहिती दिली. तसेच मी इथून बाहेर पडते, पण मरणार नाही असे तिने म्हटले आहे. मी पुन्हा शांत झोपण्यासाठी जात आहे. ज्यावेळी जगात सगळे चांगले घडू लागेल तेव्हा मला झोपेतून उठवा. या जगात द्वेष, घराणेशाही, मत्सर, जजमेंट्स, हिटलर्स, खून, आत्महत्या, वाईट माणसं या सार्यांना थारा नसेल. काळजी करु नका, मी मरणार नाहीये, काही काळासाठी या सगळ्यांपासून लांब जात आहे, असे नेहाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.