गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 10 जून 2020 (20:08 IST)

ओटीटीवर सुपरस्टार यशचा केजीएफ 1 ठरतोय लॉकडाउन-फेवरेट; आगामी केजीएफ -2 साठी ओटीटी कंपन्यांमध्ये स्पर्धा तीव्र

सुपरस्टार यश याचा कोलार गोल्ड फिल्ड म्हणजेच केजीएफ -1 हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. कोरोना व्हायरसमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मनोरंजनाची मागणी प्रचंड वाढली असून केजीएफ 1 अनेकांचा फेवरेट ठरत आहे. केजीएफ 1 च्या या यशामुळे केजीएफ -2 बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपटासाठी ओटीटी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून केजीएफ -2 च्या प्रदर्शनाचे हक्क मिळवण्यासाठी ओटीटी कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.
 
उत्तम कथा, दमदार अभिनय आणि ताकदवान चित्रीकरण याच्या जोरावर केजीएफच्या पहिल्या भागाने प्रचंड यश मिळवले. अँग्री मॅन रॉकीचे म्हणजे अभिनेता यशचे नाव संपूर्ण देशभरातील चित्रपटप्रेमींपर्यंत पोहोचले. या चित्रपटासाठी सुपरस्टार यश च्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. त्यामुळे केजीएफच्या आणखी एका उत्कंठावर्धक भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या उत्सुकतेमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही उत्तम चालेल असा अंदाज आहे. यामुळेच ओटीटी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे अधिकार मिळवण्यासाठी धडपड करायला सुरुवात केली आहे.
 
अभिनेता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची तयारी करत असून लॉकडाउन मध्ये देखील तो आपल्या टीमसोबत काम करण्यात व्यस्त आहे. केजीएफ 1 पेक्षाही सरस आणि अधिक दर्जेदार चित्रपटीय अनुभव देण्यासाठी सज्ज झाला असून या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होईल, त्यामुळे रॉकी च्या आणखी एका अभूतपूर्व प्रदर्शनसाठी तयार रहा.