मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (12:19 IST)

जान्हवी कपूरचा ‘द कारगील गर्ल‘ अवतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री जान्हवी कपूर तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवीन आणि वेगळ्या अंदाजात ती प्रेक्षकांसमोर गुंजन सक्सेना : द कारगील गर्ल हा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा घेऊन येत आहे.
 
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बॅकग्राऊंडला जान्हवीचा आवाज असून व्हिडीओमध्ये गुंजन सक्सेना यांच्या जीवनाबद्दल काही माहीत देत आहे. भारतीय पायलट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका जान्हवी साकारत आहे. 
 
या सिनेमाचं प्रदर्शन कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अडकलं. पण आता मात्र हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात जान्हवीचा नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा लवकरच ऑनलाइन प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. 
 
हा व्हिडीओ शेअर करताना जान्हवीनं लिहिलं, हा सिनेमा माझ्यासाठी फक्त सिनेमा नव्हे तर एक प्रवास आहे ज्यानं मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. एक अश्या मुलीने सर्वांना साध्या सोप्यारीत्या आपल्या स्वप्नाच्या मागे धावणे शिकवलं. जान्हवी या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे.
 
जान्हवीने धडक या सिनेमातून 2018 मध्ये बॉलिवूड पदार्पण केलं होतं.