शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 11 एप्रिल 2020 (12:02 IST)

आलिया आणि रणबीर एकत्र राहत आहे, ‘फॅमिली’साठी त्यांनी केलं एकमेकाचं शूट

काही दिवसांपूर्वी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह 11 सेलिब्रिटींनी फॅमिली या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून लोकांना घरात राहण्याचा सल्ला दिला होता. लॉकडाऊनच्या काळात सर्वांनी घरी राहून या शॉर्टफिल्ममध्ये काम केलं. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला की इतकं छान शूटिंग कश्या प्रकारे केलं गेलं असावं. तर हे जाणून मजा वाटेल की कोणाचा शूट कोणी केला. 
 
ही फिल्म प्रसून पांडे यांची कल्पना असून सर्व कलाकारांनी एकमेकांपासून दूर राहून हे चित्रीकरण केलंय. तिथे कोणीही व्हिडीओग्राफरने शूट केलं नसून त्यांच्याय घरातल्या सदस्यांनी हे शूट पार पाडले आहे.
 
सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्रचं राहत आहेत. अशात दोघांनीही एकमेकांचं शूट केलं. तर अमिताभ बच्चन यांचं शूट अभिषेकने केलं. रजनीकांत यांचा व्हिडीओ त्यांची लेक सौंदर्याने शूट केला आहे. तर प्रियांका चोप्रासाठी तिचा नवरा निक जोनास व्हिडीओग्राफर झाला. 
 
प्रसून यांनी कलाकारांना शॉर्टफिल्मची संकल्पना नीट समजावून सांगितली नंतर दुसऱ्याच दिवशी सगळ्या कलाकारांनी त्यांचे व्हिडीओ प्रसून यांना पाठविले.
 
या शॉर्टफिल्ममधून होणाऱ्या कमाईतून गरजूंना शिधा पुरविण्यात येणार आहे.