मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (11:59 IST)

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन

Amitabh Bachchan
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या या आराध्य दैवतांचे अभिवादन करुन त्यांच्या वीरतेची आठवण केली जाते. अशात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विटरवर शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
त्यांनी फारच सुंदर शब्दात आपल्या भावना शेअर करत म्हटले की 'छत्रपति शिवाजी महाराज', यह शब्द नहीं, मंत्र है। सदियों बाद भी उनसे प्रेरणा ही मिलती है। वह दुनिया के एक श्रेष्ठ योद्धा और आदर्श राजा थे। उनका स्मरण हमेशा प्रेरणादायी रहा है। छत्रपति शिवाजी महाराज जी जयंती शत् शत् नमन।
 
अर्थात 'छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शब्द नाहीत तर मंत्र आहे. अनेक शतकांनंतरही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. ते जगातील सर्वोत्तम लढवय्ये आणि आदर्श राजा होते. त्यांचा स्मरण नेहमी प्रेरणा प्रदान करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना शत शत नमन.' 
 
अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराजांचा फोटो शेअर करत हे ट्वीट केले आहे. ज्यावर हजारो लाइक्स, कमेंट्स आले आहेत.