मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (14:38 IST)

‘ए बी आणि सी डी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘ए बी आणि सी डी’ या बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात दमदार कलाकार विक्रम गोखलेंसह अमिताभ बच्चन यांना चित्रपटात बघण्याची प्रेक्षक उत्सुक आहेत. टीझरचा शेवट अजूनच उत्सुकता निर्माण करणारे आहे.
 
वृद्धवस्थेतल्या परिस्थितीला सामोरा जात असलेल्या चंद्रकांत देशपांडेंना एकेदिवशी अचानक अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक कुरिअर येतं आणि यामुळे त्यांच्या आयुष्यात जे बदल घडतात ते मजेशीर शैलीत दाखवले गेले आहे. 
 
चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद लेलेंनी केले आहे. यात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट येत्या 13 मार्च प्रेक्षकांच्या भेटी येत आहे.