मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (11:50 IST)

शासनाकडून अटींची पूर्तता करून मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता

Approval for filming
चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणी ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास काही अटींची पूर्तता करून करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, याबाबतचा शासन निर्णय आज सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे.
 
गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रपटसृष्टीतील कामे आणि चित्रीकरणास परवानगी देण्याची विनंती केली होती. 
 
कोविडसंदर्भात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक सूचना या चित्रीकरणासाठी देखील लागू राहणार असून नियमांचा भंग केल्यास कामे बंद करण्यात येणार असल्याचेही या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
 
मुंबईत चित्रीकरण परवानगीसाठी निर्मात्यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांच्याकडे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे.